Wednesday, December 6, 2017

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरीनिर्वाण दिन quotes

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरीनिर्वाण दिन quotes
1) टपुन बसला होता काळ कसा महापुरुषावर्ती
देशो देशी वार्ता पसरता हादरून गेली ही धरती
काळजातील हंस हरपला दर्याला आली भरती
सूर्य बुडाला अंधार झाला म्हणून जनता ही झुरती¡¡
विश्वभूषण, भारतरत्न, महामानव, युगपुरुष, युगप्रवर्तक, भारतीय घटनेचे शिल्पकार, बॅरिस्टर , क्रांतीसूर्य, बोधीसत्व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरीनिर्वाण दिन त्यांच्या पवित्र स्मृतिस साश्रु नयनांनी विनम्र अभिवादन आणि कोटी-कोटी प्रणाम...
2)
चला अभिवादन करू त्या महामानवाला!"होता सिंहवा सारखा भिम माझा, नव्हती त्याला कोणाची भीती,अरे, होउन गेले वर्ष जरी ही किती,आज ही बोलावते आम्हाला ती चैत्यभूमि ची माती !""क्रांतिकारी अभिवादन !"जय भिम! जय भिम! जय भिम!
3)
*"बघुनी #भिम सागर ते #वादळ वळून गेले,*
*#तुफान झोपलेले त्याला कळून गेले....*
*'
#ओखी' म्हणुनी आला होता कुणी #छळाया,*
*
स्पर्शून #चैत्यभुमी ते #वादळ नमुन गेले..!!"*
विनम्र अभिवादन
4)अंधाऱ्या राञीतला दिवा म्हणजे
" बाबासाहेब "
बौध्दांचा आवाज म्हणजे
"
बाबासाहेब "
भिमसैनिकांचे दैवत म्हणजे
"
बाबासाहेब "
एकमेव विश्र्वह्रदय सम्राट म्हणजे
"
बाबासाहेब "
कणखर नेतृत्व म्हणजे
"
बाबासाहेब "
अखंड भारताचे कैवारी म्हणजे
"
बाबासाहेब "
बौध्दांचा आवाज म्हणजे
" बाबासाहेब "
असा हा महामानव ६ -१२ -१९५६ साली काळाने आमच्या कडून हिरावून घेतला....
अशा या महामानवास कोटी...... कोटी....... प्रणाम व विनंम्र......अभिवादन.
जय ---भीम....
.5)
भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना!
आज घे ओथंबलेल्या अंतराची वंदना!
.
दुमदुमे 'जयभीम' ची
गर्जना चोहीकडे
सारखा जावे तिथे
हा तुझा डंका झडे
घे, आता घे राहिलेल्या संगरांची वंदना!
.
कोणते आकाश हे?
तू अम्हा नेले कुठे?
तू दिलेले पंख हे...
पिंजरे गेले कुठे?
या भरा-या आमुच्या...हि पाखरांची वंदना!
.
कालचे सारे मुके
आज बोलू लागले
अन तुझ्या सत्यासवे
शब्द तोलू लागले
घे वसंता, घे मनांच्या मोहरांची वंदना!
.
एक आम्ही जाणतो
आमची तू माउली
एवढे आहे खरे
आमुची तू सावली
घे अम्ही त्यांना दिलेल्या उत्तरांची वंदना!
.
जाळले गेलो तरी
सोडले नाही तुला
कापले गेलो तरी
तोडले नाही तुला
हि तुला उध्वस्त झालेल्या घरांची वंदना!
.
तू उभा सूर्यापरी
राहिली कोठे निशा?
एवढे अम्हा काळे
ही तुझी आहे दिशा!
मायबापा, घे उद्याच्या अंकुराची वंदना!
.
धम्मचक्राची तुझ्या
वाढवू आम्ही गती
हा तुझा झेंडा आम्ही
घेतलेला सोबती
ऐक येणा-या युगांच्या आदराची वंदना! 
अरे सागरा ... अरे सागरा ...
भीम माझा येथे निजला शांत हो जरा ....
6)बाबासाहेबांच्या पवित्र स्मृतिस विनम्र अभिवादन
7)भारतरत्न महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिवाण दिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन
8)महामानव विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि बहुजणांचे उद्धारकर्ते भारताचे भाग्य विधाते प. पु. बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतिस विनम्र अभिवादनकोटी कोटी प्रणाम
9)ज्ञानाच्या अथांग महासागरास
विश्वरत्न,महामानव,घटनेचे शिल्पकार 
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या
महापरिनिर्वान दिना निमित्त विनम्र अभिवादन...
10)महामानवास विनम्र अभिवादन...
11) बाबा
एकदा परत याल का
डोक्यावरून हात फिरवायला...
उणीव भासतेय ओ या एका गोष्टीची....
गरज वाटतेय खूप तुमच्या आधाराची....
राहुन राहुन कंठ दाटतोय ...
डोळ्यात आसवांचा संच साठतोय...
या ना एकदा बाबा
तुमच्या लेकरांना बघाया...
आम्ही आतूर झालोय
आमचा सुट-बुट तुम्हाला दाखवाया...
बघा ना बाबा हाताकडे आमच्या
या हातात झाडू नाही पेन हाय....
हा बंगला ही गाडी
बाबा तुमचीच तर देण हाय....
हे बघा या नोकरीमुळं
हातात पैसा खेळतोय माझ्या....
पण तुम्ही नाही बघाया
म्हणून जीव जळतोय माझा....
पावाच्या तुकड्यावर दिवस काढलात
हा शब्द जिवाला लय लागतोय...
पंचपकवानाचं ताट समोर आलं कि
तो सोन्याचा घास तुम्हाला भरवावासा वाटतोय....
खूप सोसलंत - खूप कष्ट घेतलंत
आता या आणि फक्त आराम करा....
आम्ही पोरं सगळी सुखं पदरी टाकू
तुम्ही फक्त बघुन डोळ्यात आनंद भरा....
तुमच्या चेहर्यावरचा तो आनंद
मला डोळं भरून पहायचाय....
तुमच्या कुशीत डोकं ठेवून
मनातला अश्रूंचा पाट वहायचाय....
एवढं केलंत ना आमच्यासाठी बाबा
आता आम्हाला संधी द्या...
प्लीज बाबा एकदा परत या....
प्लीज बाबा एकदा परत या.... 😞
*जय भिम*
😌 😌 😌 😌 😌
भारतिय घटनेचे शिल्पकार महामाव डाॅ.बाबासाहे आंबेडकर यांना महापरिनिर्वान दिना निमित्ताने
महामानवास विनम्र अभिवादन 
12)डोळ्यांमधून कोसळणाऱ्या आसवांना आज मुभा आहे .....
कारण *"बाबा"* तुमच्यामुळेच मी आज स्वाभिमानाने उभा आहे" .
ज्ञानाच्या अथांग महासागरास
विश्वरत्न,महामानव,घटनेचे शिल्पकार
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या
महापरिनिर्वान दिना निमित्त विनम्र अभिवादन...
13) *विश्वरत्न..!!*
🕯 💐 🕯 💐 🕯 💐 🕯 💐 🕯
*भारतरत्न..!!*
🕯 💐 🕯 💐 🕯 💐 🕯 💐 🕯
*
बोधिसत्व..!!*
🕯 💐 🕯 💐 🕯 💐 🕯 💐 🕯
*
परमपुज्य..!!*
🕯 💐 🕯 💐 🕯 💐 🕯 💐 🕯
*
महामानव..!!*
🕯 💐 🕯 💐 🕯 💐 🕯 💐 🕯
*
युगपुरूष..!!*
🕯 💐 🕯 💐 🕯 💐 🕯 💐 🕯
*
महाविदवान..!!*
🕯 💐 🕯 💐 🕯 💐 🕯 💐 🕯
*
स्त्रीउध्दारक..!!**
*
युगप्रवर्तक..!!*
🕯 🙏 💐 🕯 🙏 💐 🕯 🙏 💐
*
क्रांतीसुर्य..!!*
*
विश्ववंदनीय..!!*
🕯 💐 🙏 🕯 💐 🙏 🕯 💐 🙏
*
महान अर्थशास्त्री..!!*
*
महान इतिहासकार..!!*
🕯 💐 🙏 🕯 💐 🙏 🕯 💐 🙏
*
भारताचे कैवारी..!!*
*
भारत भाग्य विधाता..!!*
🕯 🙏 💐 🕯 🙏 💐 🕯 🙏 🕯
*
सिंबाॅल आफॅ नाॅलेज..!!*
*भारतीय घटनेचे शिल्पकार*
🕯 🙏 🕯 🙏 🕯 🙏 🕯 🙏 🕯
*
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर* *यांच्या महापरिनिर्वाण दिनी* *विनम्र त्रिवार अभिवादन***
*
कोटी कोटी प्रणाम..!!!!!!*
14) "पापणीला पापणी भिडते" त्याला
'निमित्त' म्हणतात....
वाघ दोन पावलं मागे सरकतो त्याला
अवलोकन म्हणतात....
आणि
" सारं जग ज्यांच्या विचारांवर व हुशारीवर चालतय'त्या
वाघाला "
विश्वरत्न भारतरत्न *डॉ.बाबासाहेब आंबेडकर*
म्हणतात..... 
*जय भीम*
15)बाबा जरी आपल्यात नसले तरी त्यांचे विचार जिवंत आहेत ते सदैव आपल्या सोबत राहतील जय भिम
16)सात कोटीचा प्रकाश गेला झाली जिवाची 
लाही
भिमा पाठी या जगात आता वाली उरलेला
नाही
असे म्हणुनी दलित सारे रडु लागे ढाइ
ढाइ
अमर झाली भिमाची किर्ती......
डोळ्याने मी पाहिली.....
तारन रातीची ती मर्जीऽऽऽऽऽऽ
धुर॔धरा वरती फिरली
दृष्ट काळाने भिमरायांची प्राणज्योत ती चोरली
बुद्धम शरनम गच्छामी.......
धम्मम शरनम गच्छामी......
संघम शरनम गच्छामी......
17)आकाश निळे, समुद्र निळा,निळी तुझी निशाणी.
आकाशाहूनही उंच,समुद्राहूनही खोल भिमा तुझी कहाणी.
महामानवाला विनम्र अभिवादन.
18)भारतीय सविधानाचे शिल्पकार, ज्ञानाचे अथांग महासागर, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन !!!
19)माझ्या..काळजाच्या..या
.महामानवाला...⚘विनम्र अभिवादन⚘.
20) ६ डिसेंबर ५६साली वेळ कशी ती हेरली दुष्काळाने
भिमरायाची प्राण ज्योत ती चोरली......
..... माहामानवास विनम्र अभिवादन..........
21)डोळ्यातील आश्रु व्हाहु लागले भिमा चरणी पडु लागले 
कुठे लपला भिम माझा माझे मन मालाच विचारु लागले...
भिमा तुझा लेकरु तुला पाहण्यास तडफडत आहे..
निसर्ग पण हा सारा तुझ्या आठवनीत बग रडत आहे...
कोणी चिखलात बसुन तर कोणी पावसात भिजत आहे..
पण भिम सैनिकांचे पाय चैत्य भुमी कडेच वलत आहे..
निसर्गाला माहीत नाही आम्ही किती संकट झेल्ले आहे..
आरे पावसा तुझ्या मुळे नाही तर....
आमचे शरीर आश्रु ने ओले पडले आहे...
22)बाबासाहेब,
सूर्याच्या तेजाने लाजावे
इतके शुभ्र तुमचे माझे ऋणानुबंध
माझी प्रत्येक पिढी आठवते तुम्हाला
तुमच्या व्यसंगीपणाला, कर्तुत्वाला
तुम्ही आणि तुमची कीर्ती
आता पसरली आहे सर्वदूर
अगदी सात समुद्रापलिकडे...
तुम्ही देता आहात ऊर्जा
मला वेळोवेळी लढण्याची
मी भीत नाही संकटाला
ना मी भितो भुता खेताला
तुमच्या नावाचे ताविज
मला वाचवते वादळाच्या सपाट्यातून...
इच्छेला आता फुटू लागले अंकुर
तुमच्या पाऊलखुणा होताय घट्ट
माझ्या अंगणात, अन मनात
मी स्वीकारला आहे तुमच्यातला बुद्ध
राग, लोभ, मत्सर त्यागून पुढे जातोय
शत्रूवरही करतो आहे प्रेमाचा वर्षाव...
तुमचा हा गोतावळा आला आहे
वादळ, पाऊसाची तमा नाही
तुमचे रसायन देते प्रेरणा उभं राहण्याची
मार्गक्रमण होतोय तुम्ही दाखवलेल्या मार्गाने
बाबा,
मी जास्त काही नाही,
तुमच्या चैत्यत येऊन
डोळे भरून पाहतो आहे
तुमच्या माझ्यातील नात्याला
गोंजारतो आहे अनंत काळासाठी...
23)भिमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना!
आज घे ओथंबलेल्या
अंतरांची वंदना! भिमराय घे तुझ्या या लेकरांची वंदना।
.
.
दुमदुमे जयभिमची गर्जना चोहीकडे!
सारखा जावे तिथे हा तुझा डंका जडे!
घे आता
घे राहिलेल्या संघरांची वंदना!
भीमराया घे
तुझ्या या लेकरांची वंदना!
आज घे ओथंबलेल्या
अंतरांची वंदना!
.
.
कोणते आकाश हे तु आम्हा नेले कुठे!
तु दिलेले पंख हे पिंजरे गेले कुठे?
या भराऱ्या आमुच्या
ही पाखरांची वंदना! भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना!
आज घे ओथंबलेल्या
अंतरांची वंदना!!
.
.
कालची सारे मुके आज बोलु लागले!
अन तुझ्या सत्यासवे शब्द तोलू लागले!
घे वसंता घे मनाच्या
मोहरांची वंदना! भीमराया घे तुझ्या या
लेकरांची वंदना!
आज घे ओथंबलेल्या
अंतरांची वंदना!!
.
.
एक आम्ही जाणतो
आमुची तु माऊली! एवढे आहे खरे
आमुची तु साऊली!
घे आम्ही त्यांना दिलेल्या उत्तरांची वंदना!
भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना!
आज घे ओथंबलेल्या
अंतरांची वंदना!!
.
.
जाळले गेलो तरी सोडले नाही तुला! कापले गेलो तरी तोडले नाही तुला!
ही तुला उध्दवस्त झालेल्या घरांची वंदना! भीमराया घे तुझ्या
लेकरांची वंदना!
आज घे ओथंबलेल्या
अंतरांची वंदना!!
.
.
तु ऊभा सुर्यापरी
राहीली कोठे निशा! एवढे आम्हा कळे
ही तुझी आहे दिशा! मायबापा घे उद्याच्या
अंकुरांची वंदना! भीमराया घे तुझ्या
लेकरांची वंदना!
आज घे ओथंबलेल्या
अंतरांची वंदना!! धम्मचक्राची तुझ्या वाढवू आम्ही गती!
हा तुझा झेंडा
आम्ही घेतलेला सोबती!
ऐक येणाऱ्या
युगांच्या आदरांची वंदना! भीमराया घे तुझ्या लेकरांची वंदना! आज घे ओंथबलेल्या
अंतरांची वंदना...!!! महामानव विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि बहुजणांचे उद्धारकर्ते भारताचे भाग्य विधाते प. पु. बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतिस विनम्र अभिवादन
कोटी कोटी प्रणाम.
24)ज्वालामुखीच्या उद्रेकासारखा
फाडून वर आलास इथल्या
प्रस्थापित व्यवस्थेच्या
आवरणाला ..
तडे दिलेस प्रचंड इथल्या
कपोलकल्पित दुनियेला ...
आणि ..
पेटविलेस अगणित सूर्य
धमन्यांमध्ये तुझ्या तेजाने
कधीच न विझण्यासाठी ...
थंड होऊन याच लाव्हाचा
उत्तुंग पर्वत व्हावा तसाच
अगदी तसाच ..
तू ठाण मांडून बसलायस
आमच्या केंद्रस्थानी
अखंड नि अभेद्य
आता ....आता ..
हौशे गवशे नवशे
गिर्यारोहक झालेत,
याच महाकाय गगनगिरी चे
तुझ्या शब्दांच्या दोरखंडाला
पकडून ते वेध घेतात,
तुझ्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचा
त्यांना हि आता समजलंय
धार कशी लावायची शब्दांना
नि विद्रोह कसा पेटवायचा
लेखणीतून ...
तू नव्याने मूकनायक झालास
आणि कित्येकांच्या हातातलं
बळ होऊन उतरलास,
पानांवर कधी रस्त्यांवर....
तुला विसरू कसा? "बा भीमा",
तू स्वभाव आहेस आमचा
बंडाचा, विद्रोहाचा ..
तुला विसरू कसा?
कधी हतबल झालोच नि
खचलोच मनाने तर,
पुन्हा नव्याने उर्जा घेण्यासाठी
येतो तुझ्याकडेच .. चैत्यभुमीत..
थंड झालेल्या या पर्वतातून
अजूनही जाणवते उब
तुझ्यातल्या सूर्याची ...
अविरत ! अविरत !! अविरत !!!
25)बाबा तुम्ही होता म्हणुन,
आज आम्ही ROच पाणी पीतोय नाहीतर नशिब म्हणुन
बोंबलत बसलो असतो.

बाबा तुम्ही होता
म्हणुन,
आज इंग्लीश शाळेत
शिकतोय नाहीतर
बुध्दीहीन म्हणुन
आजही उडया मारत
बसलो असतो.

बाबा तुम्ही होता म्हणुन
मानसाच्या खांदयाला खांदा लावुन चालतोय,
नाहीतर मनस्मृतीने
आजही आमचेच दहन केले असते.

बाबा तुम्ही होता
म्हणुन अंध्दश्रध्देच्या
बाहेर पडलोय,
नाहीतर 33 कोटीला
आजही पुजत
बसलो असतो.

बाबा तुम्ही होता म्हणुन
आज सन्मानाने जगतोय,
नाहीतर गळ्यात मडके कमरेला झाडु बांधुन
आजही फिरत बसलो असतो.

बाबा तुमचे उपकार
हा जन्म गेला तरी
फिटनार नाही,
भारत बौध्दमय
झाल्याशिवाय
राहनार नाही....

जय भिम.......
26)तुमच्या लेखणीने अखंड भारत देश आज घडत आहे.
बघा! *बाबा* तुमच्या आठवणीने आज आभाळ सुद्धा रडत आहे.
.
बाबानां विनम्र आभिवादन.
27)सहा डिसेंबर छप्पन साली 
वेळ कशी ती हेरली,
दुष्ट काळाने भीमरायांची
प्राणज्योत ती चोरली..!
परमपूज्य प्रज्ञासूर्य बोधिसत्त्व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६१ व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन तसेच महामानवाला
कोटी-कोटी प्रणाम..! नमो बुद्धाय! जयभीम!! जयभारत!!!
28)जाळलो गेलो तरी सोडले नाही तुला,कापलो गेलो तरी तोडले नाही तुला..
भीमराया घे तुला ह्या लेकरांची वंदना  🙏
मग पाऊस काय चीझ आहे
29)बाबासाहेब , एका गुलाबाच्या फुलाने तुमच्या उपकारांची परतफेड होणार नाही ! पण जोपर्यंत जीवंत आहे , तुम्हाला कधीच विसरणार नाही . मला अत्यानंद ह्या गोष्टीचा आहे कि मि तुमच्याबद्दल द्वेष अथवा तिरस्काराच्या भावनेने नक्कीच मरणार नाहिये . जीवनाच सार्थक तुम्हाला समजण्यात आणी समजुन घेण्यात आहे असे मला वाटते .
कोटी कोटी प्रणाम !! जय भीम !!
30) बाबा तुझी महती गायला माझ्या कडे शब्द नाही बाबा.. 😔 😣
👉हे जीवन समर्पित बाबासाहेबांना 🙏
ते होते म्हणून आपण आहोत. 😔
भीमबाबा घे तुझ्या या लेकराची वंदना 
31)हापरीनिर्वाणदिन हा दुःखाचा घाव आहे 
तरीही या गिधाडांचा संधीचा तो डाव आहे
स्वार्थी भिकाऱ्यांमुळे चळवळ दीन झाली
तरीही हे म्हणती आम्हीच तुमचे वाली
उरात अहंकार अन मुखात म्हणती स्वाभिमानी
दुकान थाटीती नवे नवे हे कसले दुराभिमानी
भीमा तुझ्या कुटुंबाला स्वार्थ्यांनी केले परके
जो तो आज म्हणे समाजाचे आम्ही म्होरके
कृतीशील बनून आम्ही देतो या भावनेला तिलांजली
तुझ्या विचारांनी आम्ही जाणार हीच तुला श्रद्धांजली
32)चला रे सारे चैत्यभुमीला 
बापाच्या चरणी ठेवाया माथा....
शपथ घेऊया जाऊनी तिथ
ऐकीने आपण नांदुया आता....
33)स्वतंत्र भारताच्या संविधानाचे शिल्पकार,
भारताचे बुकर वाशिग्टन,
प्रजासत्ताक भारताचे पहिले कायदेमंत्री,
मानवी स्वातंत्र्याचे महान कैवारी,
मानवाच्या प्रतिष्ठेसाठी लढणारा योद्धा ,
प्रख्यात कायदेपंडित , 
भारताचा राजा , 
जगातील थोर मानवतावादी ,
कुशल संसदपटू , 
लोकशाहीचा त्राता,
थोर घटनातज्ञ,
क्रांतिकारक,
समाजसुधारक,
शिक्षणतज्ञ ,
अर्थशास्त्रज्ञ ,
ग्रंथकार,
प्रभावी वकता, 
तसेच बौद्धसम्राट अशोका नंतर सुमारे २२०० वर्षानंतर विसाव्या शतकामध्ये बुद्धधम्मचक्र प्रवर्तित करणारे बोधिसत्व,जगातील सर्वश्रेष्ठ विद्वानापैकी एकच सर्वश्रेष्ठ विद्वान,परमपूज्य, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस कोटी कोटी विनम्र अभिवादन !!!
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सारखा महामानव या १० हजार वर्षात होणार नाही : - प्रल्हाद केशव अत्रे ऊर्फ आचार्य अत्रे. —34)बाबासाहेब आंबेडकरांचे समग्र आयुष्य हे अंतहीन महायुद्धासारखे होते.
परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन आणि कोटी-कोटी प्रणाम...

35स्वाभिमान विकुन मोठे होण्यापेक्षा अभिमान बाळगुन लहान राहीलेले कधीही चांगले* डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विनम्र अभिवादन

No comments:

Post a Comment